अर्थ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
उदाहरणे :
त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
समानार्थी : मुख
अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या चेहर्यावर प्रकट होणारे भाव.
उदाहरणे :
तुझा चेहराच सांगत आहे की तुम्ही रागात आहात.
समानार्थी : चेहरा, चेहर्यावरील भाव
अर्थ : एखाद्या वस्तूचा समोरील दर्शनी भाग.
उदाहरणे :
संगणकाचे तोंड माझाकडे फिरव.
अर्थ : घर इत्यादिकांचे मुख्यप्रवेश दार.
उदाहरणे :
ह्या किल्ल्याचे तोंड उत्तरेकडे आहे.
अर्थ : ज्यातून पू निघतो असा फोडाचा छिद्र पडण्याजोगा भाग.
उदाहरणे :
ह्या फोडाला तोंड फुटले आहे.
अर्थ : पदार्थ जेथून आत घालतात तो लोटी, बाटली इत्यादिकांचा वरचा भाग.
उदाहरणे :
ह्या बाटलीचे तोंड फार निमुळते आहे.
अर्थ : चेहर्याच्या बाहेरील तोंडाचा भाग ज्यात वरच्या व खालच्या ओठांचादेखील समावेश आहे.
उदाहरणे :
त्याने बडबड करणार्या माणसाच्या तोंडात मारले.
शिक्षकांनी तोंडावर बोट ठेवताच वर्गात शांतता पसरली.
अर्थ : जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते.
उदाहरणे :
ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
समानार्थी : डोळा
तोंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tond samanarthi shabd in Marathi.